शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधील शहरवासियांना नियमीत पाणी पुरवठा करण्याकरिता महाराष्ट नवनिर्माण सेना वतीने मनसे शहरअध्यक्ष, गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. तसेच यासंदर्भात मनसे वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मनसे वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरात आज जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा सुरू आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. परंतु आजतागायत तो लागू आहे. प्रशासनाची अडचण समजून शहरातील नागरिकांनी पालिकेस सहकार्य केले.
मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असतानासुद्धा प्रशासन नागरिकांचा विचार करीत नाही. नागरिकांची ही अडचण समजून आयुक्त या नात्याने आपण १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मनसेने आपणाकडे मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आम्हाला जनतेच्या या मागणीसाठी आज आंदोलन करावे लागले.
तात्काळ या मागणीचा पुनर्विचार करून आपण शहरवासियांना नियमित पाणी देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा करतो. अन्यथा मनसेला पुढील काळात कठोर भुमिका घ्यावी लागेल. याची नोंद घ्यावी.असे हि सदर निवेदनात नमूद केले आहे.
तसेच या आंदोलनात रुपेश पटेकर ,बाळा दानवले ,मयुर चिंचवडे ,अश्विनी ताई बांगर ,स्नेहल ताई बांगर ,राजु सावळे ,विशाल मानकरी,सुशांत साळवी ,सुरेश संकट ,निलेश कांबळे ,संजय मोरे ,सचिन सोनटक्के , अशोक धोत्रे , नारायन पठारे, विजया परदेशी , नितीन चव्हाण , सुजाता काटे , रवी जाधव दत्ता देवतरासे , मयुर हजारे , आण्णा कापसे , सुरेश भिसे , काशिनाथ खजुरकर , कृष्षा बिरुणगिकर सागर शिंदे , साईराम भोसले , के के कांबळे , आंनद भाकरे , रमेश उकाडे , आशिष चव्हाण रोहण कांबळे , निलेश नेटके , विद्याताई कुलकर्णी , रणजित ठाकुर ,सीमातीई बेलापुरकर, श्रद्धा देशमुख , सगिता देशमुख , सचिन मिरपगार , नितिन सुर्यवंशी , अनिताताई पांचाळ, वैशालीताई बौत्रे आकाश सागरे , रवी कोणरकर आदी मान्यवर उपस्थित होते.