शबनम न्यूज :- पिंपरी चिंचवड (दि.१७ नोव्हेंबर ) :- हिंदुरुदयसम्राट सरसेनापती वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना शाखा मोहन नगर येथे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी शिवसेना संघटक विशाल यादव विभाग प्रमुख शशिकांत पाडाळे उपविभाग प्रमुख मधुसूदन अंबुसकर विभाग प्रमुख सोमनाथ अलंकार युवा सेनेचे आशिष बाबर स्वप्निल येवले नवीन भोसले संजय पारसकर रघुनाथ कदम असे अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते .
या निमित्त आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “ हर घर दस्तक “ योजना राबविण्यात सुरुवात नगरसेविका मिनल यादव यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आली . प्रत्येकजन करोनामुक्त होण्यासाठी संपर्क कार्यालयात करोणा लसीकरण आयोजित करण्यात आली.
तरी परिसरातील नागरींकांनी लसिकरणीचा १ व २ रा डोस ( कोविशिल्ड ) घेण्याचे आवाहन करण्यात आले .