शबनम न्यूज :- पुणे (दि.१८ नोव्हेंबर ) ; भाजपा कामगार आघाडीकडून केलेल्या आवाहाना प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातील छोट्या मोठ्या 100 एस टी डेपोसमोर भाजपा कामगार आघाडीने धरणे अंदोलन, मोर्चा माध्यमातून अंदोलने केली. पुण्यात स्वारगेट येथे भाजपा कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रभर एस टी च्या सेवेत 92 हजारपेक्षा जास्त कामगार तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. त्यातच पगार न मिळालेच्या निराशेतून 40 कामगारांनीशआत्महत्या केली. त्या कामगार बांधवाना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भाजपाच्या वतीने कोकण ( पेण) मराठवाडा (औरंगाबाद) पश्चिम विदर्भ (अमरावती) पूर्व विदर्भ (नागपूर) मुंबई (ठाणे) येथील एस टी च्या उपप्रादेशिक मुख्यालयात “एसटीचे शासनात विलिनीकरण करण्याबाबतची” निवेदने देण्यात आली. बहुतांशी ठिकाणी भाजपाचे आजी माजी आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधीनी संपात सहभागी कामगार बांधवाची भेट घेऊन पाठिंबा दिला.
अनेक ठिकाणी भाजपा पदाधिका-यांनी संपात सहभागी कामगार बांधवाची चहा, पाणी व नाश्त्याची सोय केली.
गेल्या दोन दिवसात आणि आज दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अंदोलनत खालील ठिकाणी भाजपा कामगार आघाडीच्या प्रदेश, विभाग, जिल्हा, मंडल अध्यक्ष आणि पदधिका-यानी सहभाग घेऊन सक्रिय पाठिंबा दिला.
1) पुणे ( स्वारगेट), 2) ठाणे ( खोपट), 3) रायगड (पेण) 4) कोल्हापूर (इचलकरंजी), 5) कल्याण, 6) सातारा, 7) बीड, 8) चिपळूण, 9) सोलापूर,10) अमरावती ( बडनेरा), 11) अमरावती (शहर), 12) धुळे, 13) सांगली, 14) महाड, 15) नांदेड, 16) परभणी, 17) हिंगोली, 18) वर्धा, 19) चंद्रपूर, 20) अकोला 21) नागपूर 22) पिंपरी-चिंचवड 23) लातूर
येत्या दोन दिवसांत भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी महाराष्ट्रभर उर्वरित ठिकाणी असलेल्या एस टी बस डेपोत सुरु असलेल्या अंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा देणार आहे, असे भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे.