प्रदीप आबा तापकीर यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव उपक्रम
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच प्रदीप आबा तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली परिसरातील ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि वैवाहिक, सहजीवनाची चार दशके वर्ष पूर्ण केलेल्या दाम्पत्याचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर यांच्या संकल्पनेतून हा हृदयसोहळा 20 नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी सात वाजता तनिष पल्स सोसायटी समोर, हॉटेल अन्नपूर्णा शेजारी, चऱ्होली येथे संपन्न होणार आहे. या हृदयसोहळा मध्ये ज्या दाम्पत्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची 40 वर्षे पूर्ण केली आहे. अशा दाम्पत्यांचा या सोहळ्यात चऱ्होली भूषण म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. हा अनोखा अभिनव उपक्रम प्रदीप आबा तापकीर यांच्या संकल्पनेतून होत असून या कार्यक्रमास चऱ्होली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.