शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा वाढदिवस येत्या 27 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे त्यापूर्वी भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांचे समर्थक असणारे नगरसेवक नगरसेविका यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेविका , माजी शहर सुधारणा समिती सभापती सौ. सोनाली गव्हाणे तसेच भाजप शहर चिटणीस दत्ताभाऊ भगवान गव्हाणे यांच्यावतीने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आदिनाथ नगर मैदान गव्हाणेवस्ती भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली हा कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात उत्कृष्ट खेळ असणाऱ्या 51 महिलांसाठी पैठणी तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार महेश लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नगरसेविका सोनाली गव्हाणे यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावून एक वेगळाच उत्साह भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला ,तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे यांच्या कार्यक्षम पणे काम करण्याच्या प्रवृत्ती चे कौतुक केले.
यावेळी शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजाताई महेश लांडगे या प्रामुख्याने उपस्थित होत्या,या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती नगरसेवक नितीन लांडगे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका भीमा ताई फुगे, नगरसेविका नम्रता लोंढे ,नगरसेविका सारिका लांडगे , नगरसेवक राजेंद्र लांडगे , उद्योजक रोहिदास गाडे ,महादेव गव्हाणे, शंकर गव्हाणे, धनराज गव्हाणे, सतीश फुगे, देवा गव्हाणे ,शरद जाधव, रंजीत गव्हाणे, नारायण गव्हाणे, नारायण लांडगे ,रामदास लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्या महिलांना प्रथम क्रमांक टीव्ही ,दुसरा क्रमांक फ्रिज, तिसरा क्रमांक वॉशिंग मशीन, चौथे क्रमांक ओव्हन, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेऊन या खेळाचा आनंद लुटला तसेच बक्षिसे मिळविली , भेटवस्तू मिळविल्या या वेळी परिसरातील असंख्य नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती उपस्थित होते.यावेळी नगरसेविका सोनाली ताई गव्हाणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले