शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते किरण दळवी यांच्या वतीने त्रिपुरा पौर्णिमा निमित्त दिपोत्सव आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम दळवी नगर मध्ये समर्थ कॉलनी पार्वतीबाई दळवी उद्यान येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात 3100 दिवे लावून आणि पंढरीच्या विठुरायाची रांगोळी काढून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात लहान मुलांसाठी फटाके बाजी करण्यात आली. लहान मुलांनी या फटकेबाजी चा भरपूर आनंद घेतला. तसेच या दीपोत्सव कार्यक्रमानिमित्त दिवाळी फराळाचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचा आस्वाद अनेक नागरिकांनी घेतला.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि रोषणाईने परिसर उजळून गेला होता. या कार्यक्रमास शिवसेनेचे नगरसेवक गटनेते राहुल कलाटे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घुले सर यांनी केले. यावेळी या परिसरातील युवा नेते शेखर अन्ना चिंचवडे उपस्थित होते. हा कार्यक्रम शिवसेनेचे युवा नेते किरण दळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. युवा नेते किरण दळवी यांच्या मित्रपरिवाराने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व उपस्थितांचे किरण दळवी यांनी मनापासून आभार व्यक्त केले.