शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिपंरी चिचंवड महानगरपालिके तर्फे प्लॅागोथॅान २०२१ ‘चला स्वच्छाग्रही बनुया’ या स्वच्छता मोहिमे अंतर्गत आपल्या शहराला स्वच्छ व सुदंर बनविण्यासाठी शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आज पिपंळे सौदागर येथे मनपा तर्फे आयुक्त राजेश पाटील, अति. आयुक्त. विकास ढाकणे व माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थित स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आरोग्य कर्मचारी, परिसरातील नागरिक यांना स्वच्छतेबाबत जनजागृती प्रतिज्ञा शप्पथ देण्यात आली. या मोहिमेत ड प्रभाग प्रशासन अधिकारी उमाकांत गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी शशिकांत मोरे , सॅनिटरी इन्सपेक्टर राजु साबळे, आरोग्य सहा. निलेश कदम, सुहास सोनसळे, डॅा. प्रफुल्ल तपशाळकर, स्थापत्यचे सुनिलदत्त नरोटे, शिर्के व परिसरातील नागरिक, आरोग्य कर्मचारी व सोसायटी मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जसे रहाटणी, पिपंळे सौदागर हा प्रभाग कचरा कुंडी मुक्त केला. तसाच हा प्रभाग १०० टक्के प्लास्टिक मुक्त करणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.