शबनम न्युज | डोंबिवली
” चांगली माणसं संपर्कात असल्यानेच विश्वकल्याणाच्या संकल्पनेस हातभार लावण्याचे सत्कार्य करता येणे शक्य होते ” असे प्रतिपादन भारतासह 17 देशात पुर्णपणे स्वतंत्ररित्या स्वखर्चाने विश्वजोडो अभियान राबवत सबकुछ मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री.कार्यक्रमासह हजारो रसिकांना दिलासा देणारे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. नुकताच गौरव समितीतर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘विश्व महात्मा’ ही सर्वोच्च उपाधि प्रदान करण्यात आली,त्यानिमित्त सप्तस्वर इंटरनॅशनल संस्थेतर्फे सचिव विश्वास धोंगडे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन सत्कार करण्यात आला.या सत्काराला उत्तर देताना डाॅ.घाणेकर बोलत होते. अत्यंत साधे राहून निरपेक्ष.पणे मानवता धर्माचा प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी आपले सारे आयुष्यच पणाला लावत असणारे डाॅ.मधुसूदन घाणेकर एकमेव अवलिया म्हणता येतील, या शब्दात विश्वास धोंगडे यांनी डाॅ.घाणेकर यांचा गौरव केला.याप्रसंगी सहसचिव सौ.प्रतिमा अरुण काळे यांचेही गौरवपर भाषण झाले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतादत्त.स्पेशल गाण्यांच्या कार्यक्रमाने रसिकांना जिंकून घेतले.