शबनम न्यूज : मुंबई (२२ नोव्हेंबर ) :- राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थितीत होते. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.
अनिल परब म्हणाले, गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं, अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर वेगवेगळे काया मार्ग निघू शकतात. या मार्गाच्या बाबतीत त्यांनी तपासणी केली आणि एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रूळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजना आणि आता संपकरी कामगारांच्या मागण्या यावर त्यांनी आज आमच्याशी सविस्तर चर्चा केली.”
तसेच, “आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती मागणी आम्ही त्यांना दिली. यावर त्यांनी देखील सर्व माहिती अभ्यास केला आणि याबाबत वेगवेगळे पर्याय कशा पद्धतीने तयार करता येतील किंवा कशा पद्धतीने यातून मार्ग काढून कामगारांचं आणि जनतेचं समाधान करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा आज आमच्यसोबत झालेली आहे.” अशी देखील यावेळी परब यांनी माहिती दिली.