पक्षाकडून मिळाली सामाजिक कार्याची ‘बक्षिसी’
कामाच्या जोरावर संधीचे सोणे करून दाखवणार – मोरे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (२२ नोव्हेंबर ) :- भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे यांची पिंपरी विधानसभा मतदार संघाचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवा वॉरियर्सच्या माध्यमातून राज्यभरातील त्यांच्या कार्याची घौडदौड पाहून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या संघटनात्मक वाढीकरिता आपण अथक परश्रम घ्याल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अनुप मोरे यांनी 2005 मध्ये उडी घेतली. भाजपा विद्यार्थी आघाडीच्या सरचिटणीस पदावर राहून शहरातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष पद दिले. या पदावर राहून मोरे यांनी आपल्या सामाजिक कार्याची चुणूक दाखवित विद्यार्थी क्रेंद्रीत स्थान प्राप्त केले. त्यांच्या कार्याचा करिष्मा पाहून पक्षाने त्यांना भाजयुमो शहर सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी दिली. या पदाचा उपयोग घेऊन त्यांनी निगडी प्राधिकरणच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहराध्ये पक्षातील युवक-युवती, तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर त्यांच्यावर भाजयुमोच्या शहराध्यक्ष पदाची प्रमुख सुत्रे देण्यात आली. त्यातून समाजातील प्रत्येक वर्गाशी त्यांचा संपर्क वाढत गेल्याने त्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन पक्षाने त्यांचा गौरवही केला आहे.
पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात मोरे यांनी मोठे कष्ट उपसले आहेत. त्याची पोचपावती म्हणून त्यांना पक्षाने भाजपा शहर सरचिटणीस पदावर काम करायला सांगितले. तिही जबाबदारी त्यांनी खेळीमेळीने स्वीकारली. राजकारण एक आव्हान म्हणून नव्हे तर समाजकारण असल्याचा संदेश मोरे यांनी युवकांना दिला. त्यामुळेच युवकांमध्ये त्यांच्या नावाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली. शेकडो तरुणांचा फौजफाटा त्यांच्या कार्यात सहभागी होताना दिसतो. हीच त्यांच्या कार्याची पोचपावती ठरत आहे. त्यांच्या अविरत कार्याचा धडाका पाहून भाजपा कोअर कमिटीने त्यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली. त्यांची भाजयुमोच्या प्रदेश चिटणीस पदावर नियुक्ती झाली. त्यांच्यातील अफाट कामाची क्षमता पाहून त्यांना भाजपाकडून पदांची बक्षिसी मिळतच गेली. सध्या मोरे यांच्यावर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष आणि युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी आहे. या पदांचे मोठेपण जपून त्यांनी तळागाळातील नागरिकांच्या हिताचा लढा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे त्यांना पक्षाकडून पिंपरी विधानसभेचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
लोकांची कामे करण्यासाठी सदैव तत्पर – अनुप मोरे
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेले नियुक्तीपत्र पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी अनुप मोरे यांना सुपूर्द केले. यावेळी आमदार मधुरीताई मिसाळ ,महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी विधानसभेचे प्रभारी सदाशिव खाडे,प्रदेश सदस्य संतोष कलाटे, सरचिटणीस व शहर प्रवक्ता अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, आदी उपस्थित होते. तसेच, राजकारण करताना समाजकार्याला प्राधान्य देण्याचा विचार युवकांमध्ये रुजविला पाहिजे. तळागाळातील व्यक्तींच्या हितासाठी काम करण्याचा संदेश आमच्या नेत्यांनी दिलेला आहे. तोच वसा घेऊन न थांबता जनहिताचे कार्य करत आलो आहे. यापुढेही पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असेन, असे विश्वास अनुप मोरे यांनी दिला.