शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि.२३ नोव्हेंबर) :- गणेश नगर ते डांगे चौक रोडवरील व्यापारी वर्ग स्थानिक नागरीक,तसेच पालिकेचे डेप्युटी इंजिनिअर धानोरकर सर तसेच T & T Infra चे सुपरवायझर उपस्थित होते,यावेळी फाऊंडेशन व व्यापारी वर्गाच्या वतीने गणेश नगर क्रोसिंग च्या ठिकाणी सुरु असलेल्या रस्ता दुभाजकाच्या कामाला विरोध करण्यात आला, हे काम थांबले नाही तर नंतर जनआंदोलनाचा ईशारा पालिकेला देण्यात आला.
गणेशनगर मधील नागरीकांना व्यापारी वर्गाला रस्ता क्रोसिंग हे गणेश मंदिराजवळच मिळावे व त्यासाठी दोन्ही बाजुला ५ मिटरचे स्पीड ब्रेकर देण्यात यावे व त्या त्या ठिकाणी झेब्रा क्रोसिंग व अन्य उपाय योजना करण्यात याव्या असे सर्वानुमते निवेदन देण्यात आले.
लवकरच या संदर्भात आयुक्ताची भेट घेउन त्यानाही याबाबत निवेदन देणार आहोत.यावेळी सर्व व्यापारी वर्ग व थेरगाव सोशल फाऊंडेशन चे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे,निलेश पिंगळे गणेश डांगे अनिल घोडेकर,श्रीकांत धावारे,अमोल शिंदे, शंतनु तेलंग, यश कुदळे,शाहु काटे हे उपस्थित होते.