शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ नोव्हेंबर ) :- शांताराम बापू भालेकर फौंडेशनच्या वतीने रूपीनगर परिसरात आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये अडीच हजार,चित्रकला स्पर्धेत चौदाशे तर वेषभूषा स्पर्धेत बाराशे विद्यार्थ्यांनी सहभागी होवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसा निमित्ताने माजी नगरसेवक शांतारामबापू भालेकर यांच्या पुढाकाराने रूपीनगरमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राचार्य सचिव सूर्यकांत भसे, रूपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन कदम, अध्यक्ष पतंगे गुरुजी, घारजाईमाता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, सचिव बंडू राणे, उपाध्यक्ष गौतम मोकाशी, माजी नगरसेवक रघुनंदन घुले बाबुराव गाडे, स्वीकृत नगरसेवक पांडूरंग भालेकर, कॅंब्रिज शाळेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश भालेकर, संपत भालेकर,संजय आप्पा भालेकर,अशोक कोकणे, संतोष निकाळजे, किरण पाटील,शिरीष उत्तेकर, रामदास कुटे, रविराज सेतसंधी, सागर चव्हाण, दादा सातपुते,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पवार, स्वीकृत नगरसेवक गोपीआप्पा धावडे , कार्तिक लांडगे,संतोष लांडगे,अंकुश लोंढे, अजय रासकर, नाना गोडसे, शितल वर्णेकर,अस्मिता भालेकर, वैशाली भालेकर,संगिता गोडसे,निता शिंदे,स्वाती कासार , कल्पना झेंडे, कुसुम नागरगोजे, रूपीनगर शिक्षण मंडाळाच्या प्राथमिक विभागाचे शिवशरण सालोटगी , भाजपाचे शिवाजी बोडके, संतोष पवार, विनोद नवले, दत्ता चव्हाण,दत्तात्रय कुंभार, रामदास गवारे, रोहिदास भालेकर, शामराव भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस के बापू युवा फौंडेशनचे जितेंद्र बनसोडे, रामदास भोसले, सागर गायकवाड, राहुल सुरवसे, अमोल गवळी, शकील शेख, श्रेयस भालेकर, निलेश भालेकर,केतन पाटील, तुषार भालेकर, यांनी परिश्रम घेतले.
मॅरेथॉन स्पर्धा हि मोठा,मध्यम व लहान अशा तीन गटात घेण्यात आली.
सायकल
मोठा गट
• प्रतीक शिंदे
• स्वरा जगताप
मध्यम गट
• अनिश अडके
• स्वरा तांबे
लहान गट
• हितेश सरगरा
• सई भारंबे
घड्याळ
मोठा गट
• आदित्य भालेकर
• गुंजन मेवाडा
मध्यम गट
• गणेश लोखंडे
• अंजली कांबळे
लहान गट
• खुशबू पाटील
• आर्यन बाबर
रोख रक्कम 5000 रुपये ( टॅब )
• अभिषेक कालबांडे – मध्यम गट
• प्रिया कदम – मोठा गट
• अंजली कांबळे – लहान गट
चित्रकला
• सायकल – सृष्टी पंडगळे
• घड्याळ – स्वराली मोरे
• रोख रक्कम 5000 रुपये – साई भोसले
वेशभूषा स्पर्धा
• सायकल – श्रावणी कुसळे
• घड्याळ – मोनिका सावंत
• रोख रक्कम 5000 रुपये – मृदुल गोळे
यावेळी आयोजक शांतारामबापू भालेकर म्हणाले कि, दीड वर्षे कोरोनाच्या महामारी मुळे मुलांना बिंधास्तपणे खेळात बगाडता आले नाही.
कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर मुलांकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
पुन्हा चिल्ड्रन फनफेअर
(दि. २८ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले आहे.
तळवडेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
खास लहान मुले व मुलींसाठी आयोजित केलेल्या या
कार्यक्रमाला अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद तळवडेवासीयांकडून मिळाला. बालगोपाळांसाठी बालजत्रा, खाऊ गल्ली व विविध खेळ हि आनंदाची पर्वणीच ठरली.
बच्चे कंपनीसाठी सिंहगड सफर…
लहान मुलांना छत्रपती शिवरायांचे विचार तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांचा अतुल्य पराक्रम थेट ऐतिहासिक सिंहगड सफरच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या सिंहगड सफर साठी तब्बल २ हजार लहान मुलामुलींनी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे.