शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ नोव्हेंबर ) :- आमदार महेश दादा लांडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त जाधव वाडी चिखली प्रभाग क्रमांक 2 मधील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनम ताई रवी शेठ जांभुळकर जाधव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध किर्तनकार तसेच प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे सुश्राव्य असे कीर्तन जाधवाडीमध्ये झाले.
या कार्यक्रमाला प्रभागांमधील मायबाप, जनतेने आमदार महेश दादा लांडगे यांना अश्व देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये या किर्तन सोहळ्यामध्ये भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांचा सपत्नीक निवृत्ती महाराज देशमुख तसेच सोनमताई जांभुळकर रवी शेठ जांभुळकर यांच्या हस्ते तुळशीहार तुकाराम महाराजांची पगडी व उपरणे देऊन त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन जाहीर असा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महापौर राहुल जाधव, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेवक संतोष मोरे, नगरसेवक सागर शिंदे, नगरसेविका सारिका ताई बोराडे, भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्षा उज्वलाताई गावडे ,शिवसेनेच्या रूपालीताई अल्लाट तसेच शिवसेनेच्या गौरीताई घंटे या उपस्थित होत्या.