शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 26 नोव्हेंबर 2015 रोजीपासुन दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान सन्मान दिवस’ म्हणुन साजरा व्हावा असे घोषित केले त्याचे कारण म्हणजे याच दिवशी 1949 साली आपल्या देशाला संविधान मिळाले होते. स्वंतत्र भारताच्या नवनिर्माणाचे कार्य याच संविधानाच्या रुपाने सुरु झाले.
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 18 च्या वतीने आज चिंचवडगावातील संत गाडगेबाबा महाराज चौकात पूजनिय डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच संविधानाच्या उद्देशिकेच्या 1000 प्रतिंचे वाटप व अन्नदान करून ‘71 वा संविधान सन्मान दिवस’ साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक समरसता मंचाचे पंजाबराव मोंढे, ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेशजी भोईर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, राजाभाऊ गावडे, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, ब’प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठलजी भोईर, शिक्षण मंडळ मा.सदस्य गजाननजी चिंचवडे, मंडलाध्यक्ष योगेशजी चिंचवडे, प्रबुद्ध संघाचे अध्यक्ष अशोकजी सोनावणे, अशोक कदम सर, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, ओबीसी महीला आघाडीच्या सरचिटणीस सोनाताई गडदे, नूतनताई चव्हाण, फरगडे सर, जेष्ठ नेते रविंद्रजी देशपांडे, मुकुंदजी गुरव, गणेशजी गावडे आदी प्रमुख मान्यवर व चिंचवड मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.