आमदार महेश लांडगे यांनी केले नगरसेवक लक्ष्मण शेठ सस्ते यांच्या कार्याचे कौतुक
शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
भोसरी विधान सभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यमान नगरसेवक माजी क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या वतीने रमेश परळीकर प्रस्तुत वहिनी पुन्हा एकदा होम मिनीस्टर या कार्यक्रमाचं आयोजन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात महिला भगिनींनी तुफान प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास लाडके आमदार महेश दादा लांडगे यांनी उपस्थिती लावून सर्वांशी संवाद साधला.
यावेळी लकी ड्रॅा चे आयोजन करण्यात आले लकी ड्रॅा स्पर्धेतील पहिल्या सात विजेत्यांना आकर्षक ७ बक्षिसं आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते देण्यात आली . शिवाय, प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक साडी भेट देण्यात आली . हा कार्यक्रम शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर २१, वेळ सायं.६ वा. नगरसेवक लक्ष्मणशेठ सस्ते पाटील यांच्या निवासस्थानाशेजारी, शिवाजीवाडी, मोशी. येथे संपन्न झाला
या कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम क्रमांकास सोन्याचे नेकलेस व पैठणी, दुसऱ्या क्रमांकास सोन्याचे कानातील दागिने, तिसर्या क्रमांकाचा सोन्याची अंगठी, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या फ्रिज, पाचवा क्रमांक विजेत्यास पिठाची गिरणी, चाव्या विजेत्यास ओव्हन, तर सातवा क्रमांक असणाऱ्या विजेत्यास वॉटर प्युरिफायर असे मोठ्या किमतीचे बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी नगर सेवक लक्ष्मण सस्ते यांच्या कार्य चे कौतुक केले