शबनम न्यूज :- पिंपरी चिंचवड (दि.२९ नोव्हेंबर) :- आज एच.ए. कॉलनी येथे अँटिबायोटिक्स रिक्रिएशन क्लब च्या वतीने सालाबादप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १०वी, १२वी, व पदवीधर शिक्षण झालेल्या मुलांचे या ठिकाणी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आलं.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी.वाय पाटील अभयांत्रिकी विद्यालयातील एच.ओ.डी. डॉ. रामदास बिरादार होते व त्यांनी मुलांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाचे आयोजन ए.आर.सी क्लबचे उपाध्यक्ष श्री .संजय देशमुख , जनरल सेक्रेटरी श्री. नितीन नलावडे , गेम्स सेक्रेटरी श्री. शिवप्रसाद करमरकर व सर्व पदाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस( पिंपरी चिंचवड शहर) जनरल सेक्रेटरी कु. दिशान मुखर्जी यांनी केले.
Advertisement
Advertisement