शबनम न्युज | पिंपरी- चिंचवड
पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १४ मधील मनपा आकुर्डी रुग्णालयात सर्व आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यास सुरु करा,अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठाण,संस्थापक/अध्यक्ष निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ मधील मनपा च्या वतीने उभारण्यात आलेले नवीन १०५ बेडचे मोठे आकुर्डी रुग्णालय गेले चार महिन्यांपासून फक्त कोरोना बाधीत रुग्णांना उपचार घेण्यासाठी सुरु करण्यात आले होते. दुसऱ्या कोणत्या आजारावर या रुग्णालयात उपचार केले जात नाही, आत्ता फक्त कोविड रुग्णांसाठी हे रुग्णालय सुरु आहे. पण गेले एक महिन्यांपासून पिंपरी चिंचवड़ शहरा मध्ये कोरोना बाधीत होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामळे आकुर्डी रुग्णालयात देखील कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. बरेच बेड मोकळे आहेत. तरी हे सर्व लक्षात घेता आकुर्डी नवीन रुग्णालयामध्ये सर्व आजारांवर उपचार देण्यास सुरु करावेत, त्या मुळे आकुर्डी निगड़ी प्राधिकरण चिखली या परिसरातील नागरिकांना ycm रुग्णालय पिंपरी येथे जाण्यापेक्षा नवीन आकुर्डी रुग्णालय जवळ आहे. या ठिकाणी जऱ सर्व आजारांवर उपचार सुरु झाले तर नागरिकांना उपचार घेता येतील लांब ycm रुग्णालय पिंपरी येथे जाण्याची गरज बसणार नाही नवीन आकुर्डी रुग्णालय हे १०५ बेडचे हॉस्पिटल आहे. बेड मोकळे राहण्या पेक्षा त्याचा उपयोग सर्व आजारांवर उपचार देण्यासाठी व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तरी आपण या सर्व बाबींचा विचार करता प्रभाग क्रमांक १४ मधील नवीन आकुर्डी रुग्णालय सर्व आजारांवर उपचार देण्याकरिता लवकरत लवकर सुरु करावे, या साठी नागरिकांच्या वतीने मागणी करत निवेदन देत आहे. असे ही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.