पुणे :- आंतरराष्ट्रीय प्रेम काव्य स्पर्धेत,भारतातील पिंपरी चिंचवड मधील,निगडी प्राधिकरण पुणे,४४ येथील सौ.प्रतिमा अरुण काळे यांच्या काव्य रचनेला प्रथम पारितोषिक मिळाले. समर्पण संस्थेची सचिव,सप्तसूर इंटरॅशनल संस्थेची सहसचिव,अक्षरमंच कला अकादमी,घाटकोपरची सचिव, रचियता साहित्य मंचची सदस्य,पर्यावरण मित्र बहुउद्देशिय,भारत संस्थेची महिला निरीक्षक,राधाकृष्ण इंटरनॅशनल संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाची सह निमंत्रक,साहित्य गौरव व मधुरंग संस्थांची सहसचिव.अशा विविध संस्थांचे पदभार सांभाळणाऱ्या,तसेच माध्यमिक शिक्षिका,उत्तम कवयित्री,लेखिका ज्या स्वतः ही विविध स्पर्धांचे,काव्य संमेलनाचे,आयोजन करतात,परीक्षण करतात अशा सौ.प्रतिमा काळे मॅडम यांना हा पुरस्कार प्राप्त झाला ही कौतुकास्पद गोष्ट आहे.ही स्पर्धा खास महिलांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन पद्धतीने भरविण्यात आली होती.आपल्या भारतातील परंतु वास्तव्यास इतर देशात असणाऱ्या महिलांसाठी खास मराठी भाषेत प्रेमकाव्यरचना स्पर्धा घेण्यात आली.त्यात विविध देशातील,अमेरिका,कॅनडा,भारत,नेदरलँड,स्विझरलँड,इटली ..इत्यादी देशातील महिलांनी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.प्रेम भावना आपल्या काव्यातून व्यक्त करायची होती.
ऑनलाईन पद्धतीने गूगल मिट वर, लायन ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकसॆ अवॉर्ड विनर,विश्व महात्मा..सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय उपाधि प्राप्त असणारे, मा.सर डॉ.मधुसूदन घाणेकर सर,रेग्युलस तारा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.पुरस्कार स्वीकारताना सौ.प्रतिमा काळे मॅडमचे अभिमानाने मन भरून आले.मनोगत व्यक्त करतांना त्या बोलल्या की,मा.घाणेकर सरांकडून खूप काही चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत.या वयात ही मनाला नित्य तरुण ठेवले आहे,सौंदर्यदृष्टी अप्रतिम आहे.परोपकार भावनेतून केले गेलेले त्यांचे कार्य खूप गौरवास्पद आहे.त्यांच्या कायम ऋणात राहील..अशीच कौतुकाची थाप त्यांची कायम मिळावी.सर,नेहमी प्रेरणास्थान म्हणून राहतील.