शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०१ डिसेंबर) :- आज दिवसभर पिंपरी चिंचवड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील साने चौक परिसरात रस्त्यावर पाणी ओसंडून वाहत होते. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने पाणी तुंबले आणि तुंबलेले पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या सर्व अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता.
या समस्यांची माहिती या परिसरातील युवा नेते पांडा भाऊ साने यांना मिळाली असता त्यांनी स्वतः पाण्यात उतरून रस्त्यावरचे साचलेले पाणी इतरत्र वाहण्यास रस्ता मोकळा करून दिला व साचलेले पाणी एका चेंबरमध्ये सोडून वाहतुकीस रस्ता मोकळा करून दिला. युवा नेते पांडा भाऊ साने यांचे तत्परतेने नागरिक त्यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत.
Advertisement
Advertisement