शबनम न्यूज |पुणे (दि.०१ डिसेंबर) :- प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी तर घेतली पाहिजेच, मात्र त्याबरोबर मनाचे आरोग्य सांभाळले पाहिजे.
पतंजली योगानुसार आपण आपली इंद्रिये काबूत ठेवली पाहिजेत. षड्रिपुंवर विजय मिळवला तरच आपले जीवन यशस्वी होईल.चौरस आहारावर भर द्या.व्यसनापासून दूर रहा.सकारात्मकता,प्रबळ इच्छाशक्ती सत्कार्य.मग्नता,उच्च ध्येयवाद यामुळे आयुष्य यशस्वी होऊ शकते.जीवनातील शाश्वत आनंदासाठी ब्रह्मध्यान करा !” असे प्रतिपादन पहिल्या आंतरराष्ट्रीय ब्रह्मध्यान परिषदेचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कीर्तिचे ज्येष्ठ विचारवंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. सॅम इंटरनॅशनल नॅचरोपॅथी शिबिराचे उदघाटन डाॅ.घाणेकर यांच्या शुभ हस्ते झाले.
याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी सॅम इंटरनॅशनल.च्या संस्थापक अध्यक्ष डाॅ.समता कुलकर्णी होत्या. डाॅ.गजेंद्र कुमार (हरिद्वार) आणि डाॅ.समता कुलकर्णी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्युप्रेशर,वेट मॅनेजमेंट, मुद्रा थेरपी, कलर थेरपी, सुबोध थेरपी आदि विविध पध्दतीने रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.गुडघेदुखी,अंगदुखी,अपचन, मधुमेह, निद्रानाश इ.व्याधिंबाबत रुग्णांना मार्गदर्शन केले जाईल अशी माहिती याप्रसंगी डाॅ.समता कुलकर्णी यांनी दिली.सदर शिबिर 1डिसेंबर 2021ते 7 डिसेंबर 2021 या काळात स्वर्ण हाॅटेल नजीक दांगट पार्क, वारजे पूल-पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
याच सोहळ्यात डाॅ.समता कुलकर्णी आणि डाॅ.गजेंद्र कुमार यांना फ्रेंड्स क्रिएशन तर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभ हस्ते 2021 चा इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ॲवाॅर्ड प्रदान करण्यात आला. याप्रसंगी इंटरनॅशनल पोएटस संस्थेच्या सहनिमंत्रक प्रतिमा अरुण काळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ साळुंके,चैत्राली साळुंके,दत्तात्रय माने तसेच मधुरंग इंटरनॅशनलचे प्रसिध्दीप्रमुख यशवंत गरड आदि मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी डाॅ.समता कुलकर्णी (मो.9823110480)यांच्याशी संपर्क साधावा.