शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०२ डिसेंबर) :- प्राधिकरण निगडी येथे राहणाऱ्या सुरेखा दयाराम क्षीरसागर यांना महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी द्वितीय क्रमांक मिळाल्या बद्दल त्यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका शर्मिला बाबर उपस्थित होत्या.
*सौभाग्यवती सुरेखा दयाराम क्षीरसागर यांना २०२१ महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दुसरा क्रमांक मिळाला . अहिराणी कस्तुरी मंच* अस्सल मराठमोळी संकल्पना असलेल्या मराठी सौंदर्य सम्राज्ञी आणि सम्राट महाराष्ट्राचा दि.२४ऑक्टोबर रविवार हॉटेल कलासागर पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी मा. मिलिंद गुणाजी मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते ,मा.श्रेया बुगडे सुप्रसिद्ध अभिनेत्री चला हवा येऊ
द्या फेम सुप्रसिद्ध अभिनेता मा. पंढरीनाथ कांबळे, सिद्धी पाटणे ,गोव्याच्या किनाऱ्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री, सुप्रसिद्ध कलाकार चेतन मस्के तसेच शांताबाई फेम मधील राधिका पाटील सुप्रसिद्ध अभिनेत्री हे सगळ्यांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक विजया मानमोडे यांनी हॉटेल कलासागर कासारवाडी पुणे येथे 2021 ची महा प्रतियोगिता सोहळा संपन्न झाला.यात महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी द्वितीय क्रमांक सौभाग्यवती सुरेखा दयाराम क्षीरसागर यांना मिळाला .
खरच मी सगळ्यांचे खूप ऋणी आहे. खरंच मी भाग्यवान आहे मला खूप छान परिवार मिळाला असे सौभाग्यवती सुरेखा दयाराम क्षीरसागर यांनी सांगितलं .