शबनम न्यूज | मुंबई (दि.०२ डिसेंबर) :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ठाकरे सरकारने तगडा झटका दिला आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांना होमगार्डच्या महासंचालकपदी नेमण्यात आले होते. मात्र त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. हा आरोप करून ते कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल २३४ दिवस फरार झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्याने गेले काही महिने अज्ञातवासात गेलेले परमबीर सिंग हे मुंबईत दाखल झाले होते.
परमबीर सिंग यांच्यावर बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता या कारणावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातून परतताच पहिल्याच दिवशी आज फाईलवर स्वाक्षरी करून परमबीर सिंग यांना तगडा हादरा दिला आहे.