शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ व सामाजिक कार्यकर्त्या रुपाली ओव्हाळ यांच्या वतीने मोफत अंबाबाई व ज्योतिबा दर्शन यात्रा कोल्हापूर 2021 आयोजित करण्यात आली होती. यात्रेत अनेक नागरिकांनी, महिलांनी सहभाग घेतला व यात्रेचा परिपूर्ण आनंद लुटला.
या उपक्रमाबाबत माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोरोना महामारीनं जवळजवळ दीड दोन वर्षे सगळ्यांनाच एका जागी जखडून ठेवलं होतं. हे संकट कधी संपेल आणि कधी आपल्याला मोकळा श्वास घेता येईल, बाहेर फिरायला जाता येईल, याचीच आपण सर्वजण वाट पहात होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शासनाने सर्वच धार्मिकस्थळे बंद ठेवली होती. त्यामुळे नागरिकांना देवदर्शनदेखील दुर्लभ झाले होते. परंतु आता कोरोना संकट हळूहळू कमी होत आहे. ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे.
शासनाने देखील गेली एक दीड वर्षे बंद ठेवलेली धार्मिकस्थळे देवदर्शनासाठी आता खुली केली आहेत. माझ्या परिसरातील नागरिकांना देवदर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई आणि ज्योतिबा दर्शन सहलीचे आयोजन केले होते . यानिमित्ताने नागरिकांना मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेता आले आणि निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता आला .
कोरोनामुळे लोकांना बाहेर फिरायला जाणे सोडाच; पण घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले होते. या सहलीच्या माध्यमातून त्यांना एकमेकांशी संवाद साधता आला . एका ठिकाणी बसून आलेली मरगळ घालवता आली आणि काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळावी. हीच या सहल आयोजनामागील माझा उद्देश आहे. नागरिकांनी या सहली मध्ये सहभागी होऊन आनंद घेतला.