शबनम न्युज | पुणे
प्रभाग क्रमांक 28 रहाटणी पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, साई चौक, पिंपळे सौदागर मधील सौदागर स्पोर्ट्स संकुलाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नाशिक फाटा ते हिंजवडी या बीआरटीएस मार्गावर पिंपळे सौदागर ते वाकड व पिंपळे निलख मार्गाला जोडणार्या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले असून. या ग्रेट सेपरेटर चा एक मार्ग काही दिवसापूर्वी खुला करण्यात आलेला आहे, या मार्गावर वाहनाची खूप वर्दळ असते या मार्गावरून हिंजवडी ला जाणारा व येणारा खूप मोठा वर्ग आहे त्यांना या मार्गाचा खूप उपयोग होईल व वाहतूक कोंडीतून सुटका होईल. येथील दुसऱ्या ग्रेड सेपरेटरच्या मार्गाचे काम देखील पूर्ण झालेले असून त्याचे उद्घाटन करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा. तसेच पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्र. ३६७ अ येथे बहुउद्देशीय खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे या मैदानामध्ये रंनिग ट्रॅक, क्रिकेट, टेनिस, ओपन जिम, फुटबॉल, व स्पोर्ट्स म्यूरल इत्यादी खेळांचा प्रकारचे ग्राउंड विकसित करून ते पूर्ण झालेले असून त्याचे देखील उद्घाटन करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. तरी माननीय आयुक्त महोदय वर नमूद केलेल्या जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटर व पिंपळे सौदागर येथील सौदागर स्पोर्ट्स संकुल चे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात यावे, असेही सदर निवेदनात नगरसेवक नाना काटे यांनी नमूद केले आहे.