शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मौजे थेरगाव येथे मुस्लिम समाजासाठी नव्याने दफनभूमी विकसित करण्यात यावी, अशी मागणी महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची लोकसंख्या असून, सध्या स्थिती मध्ये थेरगाव गावातील बांधवांना अंत्यविधीसाठी थेरगाव गावांमध्ये दफनभूमी नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात गैरसोय होत असते. तसेच सर्वत्र कमी जागांमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मुस्लिम समाजासाठी दफनभूमी मध्ये रिसायकल पद्धतीने दफन विधी करण्याची पद्धत अवलंबली जात आहे. मूळ जागेत पाच ते सहा वर्षानंतर पुन्हा त्याच जागेत दफन केले जाते. तरी सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असतात. तसेच लोकवस्तीपासून दूर असणाऱ्या जमिनीवरही मुस्लिम समाजासाठी नव्याने दफनभूमी विकसित करण्याबाबत मुस्लिम बांधवांकडून व काही मुस्लीम संघटनांकडून वारंवार मागणी होत असून, प्रभाग क्रमांक 23 मौजे थेरगाव येथे मुस्लिम समाजासाठी नव्याने दफनभूमी विकसित करण्यात यावी, असेही नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी सदर निवेदनात नमूद केले आहे.