शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 23 मधील असंघटित कामगारांसाठी केंद्र शासनाची योजना असलेल्या ई श्रमिक कार्ड नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. या ई श्रमिक कार्ड नोंदणी करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारचे फायदे मिळणार आहेत.
या अंतर्गत असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्ती चा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल व त्या धोरणांचा फायदा कामगारांना होईल, इ -श्रमिक कार्ड तयार केल्यानंतर असंघटित कामगारांना सरकार कडून एक वर्षासाठी विमा मोफत दिला जाईल तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन नाही.
या नोंदणीसाठी कामगारांना आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. घरकाम करणार्या महिला, रस्त्यावरील विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे, शेतकरी, रिक्षाचालक, मेकॅनिक, शिलाई मशीन कामगार, नाव्ही कामगार , आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सुतार काम करणारी व्यक्ती, पेंटर, प्लंबर, कामगार, इलेक्ट्रिशियन, ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिला, हॉटेलचालक, पेंटिंग काम करणारी व्यक्ती, भाजीविक्रेते, लोहार, सुरक्षा कर्मी, वीट भट्टी कामगार, लेदर कामगार, फळविक्रेते, बचत गट महिला, हातगाडा कामगार, वृत्तपत्र विक्रेते , विडी कामगार, सेंट्रींग कामगार , बांधकाम कामगार, पशुपालन करणारे, लहान व सीमांत शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार , स्वा मिल कामगार, मीठ कामगार, विणकर, लेबलिंग व पॅकिंग करणारे कामगार इत्यादी कामगार ही श्रमिक कार्ड बनवून घेऊ शकतात. तरी या कामगारांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत सपकाळ यांनी केले आहे. या श्रम कार्डाची नोंदणी अभियान प्रारंभ करण्यात आला. यावेळी शशिकला ताई सपकाळ, घीसा राम चौधरी, महादेव राऊत, भिमराव इमडे निसार बेग, अमित गायकवाड व मित्रपरिवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.