शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
कुमठा नाका, सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील हॉलमध्ये मॅटवर दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी संपन्न झालेल्या चौथ्या खेलो इंडिया विभागीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करीत नेवासा येथील दादासाहेब हरिभाऊ घाडगे अहमदनगर वर 25 -17 अशी 8 गुणांनी मात करत अंतिम सामना जिंकला.
विजय संघाकडून भूमिका गोरे, मनीषा राठोड, पूजा तेलंग यांनी उत्कृष्ट चढाया तर शिफा वस्ताद, कोमल राठोड, सविता गवई, रूपाली डोंगरे यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. संघातील प्रतीक्षा लांडगे, तेजल महाजन, विद्या गायकवाड, निकिता माळी, सखुबाई जाधव यांच्या सांघिक प्रयत्नाने सदर संघाचा विजय सुखकर झाला.
पीसीएमसी विजयी कबड्डी संघाचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मदन पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड मनपाचा क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघ दिनांक 15 डिसेंबर 2021 ते 16 / 2021 दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पात्र झाला आहे.
विजय कबड्डी संघाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, प्रशासनाधिकारी परशुराम वाघमोडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण पवार, क्रीडा पर्यवेक्षक विश्वास गेंगजे, क्रीडा पर्यवेक्षक अनिल मगर, माध्यमिक विद्यालय थेरगाव चे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, पर्यवेक्षक रामेश्वर पवार यांनी कौतुक करत पुढील स्पर्धेत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सदर संघाला गोपीचंद करंडे, कालिदास लांडगे यांचे सहकार्य लाभले. आठवे बि.जी. यांनी मार्गदर्शन केले व कब्बडी संघाचे व्यवस्थापण सोनाली जाधव यांनी केले.