शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या परिस्थितीत विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून, त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दिनांक 24 नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिला तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्यांच्या दोन्ही मुली असे एकूण सहा जणांचा प्रयोगशाळां नमुन्यामध्ये ओमायक्रोन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज सायंकाळी दिला. या सहाजणांपैकी तीनजण नायजेरिया हुन आले आहेत, तर तिघे त्यांचे निकटवर्तीय आहेत. नायजेरियाचे नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षीय महिला तिच्या बारा वर्षीय आणि अठरा वर्षाच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रोन विषाणूची बाधा असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या तिघींच्या तेरा निकटवर्तीयांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि सात वर्षाच्या दोन मुली या कोविद बाधित आल्या होत्या. यात तिन्ही निकटवर्तीयांमध्ये देखील ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.
नायजेरिया होऊन आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर पाच जणांना कसली हि लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन घेतलेले आहे. दोघींनी कोविड शिल्ड तर एकाने कोवॅक्सीन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात भरती असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये परदेशाओमिक्रोनतून आलेल्या प्रवाशांची देखील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे/ विषाणू मध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून. याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे, मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सॅनिटायझर चा वापर करावा तसेच मागील महिन्यातील जी प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आलेले आहेत. त्यांनी आपली covid-19 ची तपासणी करून घ्यावी, असे सर्व नागरिकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.