शबनम न्यूज | मुंबई (दि.०८ डिसेंबर) :- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना आणखी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांनी 10 डिसेंबरपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. एसटी संप, ओमायक्रॉनचा धोका आदींमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी निश्चित झालेल्या महाविद्यालयांमध्ये पोहोचता येत नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह संघटनांनी केली होती. याला प्रतिसाद देत सीईटी सेलने मुदतवाढ दिली आहे.
previous post