शबनम न्यूज | सोलापूर (दि.०८ डिसेंबर) :- सोलापूर महानगरपालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिले आहेत. यामुळे शहराच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडली आहे.
राजेश दिलीप काळे (वय 41, रा. फ्लॅट नं. 101, गॅलक्सी अपार्टमेंट, वीरशैव नगर, सोलापूर) भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर त्यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून निमयबाह्य पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरीक व व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, सरकारी काम करणार्या अधिकारी-कर्मचार्यांना धाकधपाटा दाखविण्याच्या उद्देशाने अंगावर जाणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. उपमहापौर काळे यांच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयात दाद मागणार
आपल्यावर राजकीय द्वेषातून खोटे आरोप झाले आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारवाई करण्यात आलेली असल्याचा दावा उपमहापौर राजेश काळे यांनी केला आहे. तसेच याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही राजेश काळे यांनी म्हटलं आहे.