इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे आवाहन
शबनम न्यूज | पुणे (दि.०८ डिसेंबर) :- आरक्षण आणि एकुणच सामाजिक, राजकीय संदर्भात अल्पसंख्यांक समुदायांवर अन्याय होत असल्याची व्यथा मांडण्यासाठी १८ डिसेंबर हा अल्पसंख्यांक दिन ‘थट्टा दिवस ‘ म्हणून साजरा करण्याचे आवाहन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
१८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन देवून थट्टा दिवस साजरा करू, असे आवाहन असलम इसाक बागवान,इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप यांनी केले आहे.
भारतदेशात मुस्लिम,शिख,ख्रिश्चन,जैन,बौध्द आदी अल्पसंख्याक मध्ये मोडतात. १८ डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा होतो.गेले कित्येक वर्षापासून अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे माँबलिंचीग होत आहे, आरक्षण, राजकिय आरक्षण या पासून यांना षडयंत्र करून दूर ठेवले जात आहे.मागिल वर्षी १८ डिसेंबर हा दिवस इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे थट्टा दिवस म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरा करण्यात आला होता. याहि वर्षी अल्पसंख्याक मंत्रालयाने १८ डिसेंबर हा दिवस आँनलाइन पध्दतीने साजरा करण्यात याव असे आदेश सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.
प्रत्येक पक्षात ज्यांना फादर बॉडीवर घ्यायचेच नसते .त्यांना वेगळे ठेवण्याकरीता अल्पसंख्याक सेलची स्थापना करून अगदी पध्दतशीरपणे राजकिय घडामोडीत हि अल्पसंख्याक बनवून शोभेपुरता वापर या पदाधिकारी यांचा करण्यात येतो.
सर्व पक्षातील अल्पसंख्याक विभागातील अध्यक्ष,उपाध्यक्ष,प्रभाग अध्यक्ष,चिटणिस यांना आवाहन आहे, केवळ एका सेलचे पद मिळते म्हणून समस्त समाजाचे नुकसान करू नका,असे बागवान यांनी म्हटले आहे.
सर्वच राजकीय पक्ष अल्पसंख्यकांना चाँकलेट देवून अगदी पध्दतशीरपणे आपला राजकिय वापर करून घेत आहेत. १८ डिसेंबर (अल्पसंख्याक दिवस) हा अल्पसंख्याकांची थट्टा दिवस म्हणुन साजरा करून या सर्वच पक्षांचा सेक्युलर भावना सर्वासमोर आणू,१८ डिसेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन देवून थट्टा दिवस साजरा करू, असे आवाहन असलम इसाक बागवान,इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप यांनी केले आहे.