शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ डिसेंबर) :- निगडी जागतिक दिव्यांग दिन व उडान दिव्यांग फौऊडेशन वर्धापनदिनानिमित्त औचित्य साधून प्राधिकरण येथील खान्देश मित्र मंडळाच्या सभागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात दिव्यांगसाठी रोजगार विषयक माहिती सत्र , शासकीय योजनेची माहिती , दिव्यांग सशक्तिकरण शिबिर , कृत्रिम पाय , कॅलिपर, कुबड्या इतर तपासणी व मोजमापाचे शिबिर , दिव्यांग प्रणामपत्र यांची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर दिव्यांग क्षेत्रातील काम करणारे प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला, त्यात श्री दत्ता भोसले , राजेंद्र वाकचौरे , हरिदास शिंदे आशोक सोनावणे , रमेश शिंदे , विजु शिंगे , संजय धोंगडे , अर्चना गुंडरे , सारिका राजपुत , संदिप बारणे , पृथ्वीराज चव्हाण , नागेश काळे , किशोर दिघे , जीवन टोपे , धनजय कांबळे , नवीन खंडागळे , संजय डोईफोडे , यांचा सत्कार करण्यात या कार्यक्रमाचे प्रमुख श्री सतीश आचार्य, विजू अण्णा जगताप, श्री बाप्पू अण्णा कातळे, पै गणेश बोत्रे, श्री अशोक मगर, व मल्हार आर्मी शहर अध्यक्ष दीपक भोजने उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद बनसोडे, सचिव बाळासाहेब तरस , रवी भिसे, हरेश्वर गाडेकर, योगेश सोनार, मोहम्मद रफी पटेल, प्रविण भोसले साईनाथ कांबळे सचिन खरात यांनी प्रयत्न केले आणि दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.