शबनम न्यूज | पुणे (दि.१० डिसेंबर) :- सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२१-२२ साठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र आदी प्रवर्गाच्या ८ वी, ११ वी आणि व्यावसायिक अथवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.
गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या व सतिगृह प्रमुख किंवा गृहपाल यांचेकडून प्राप्त करून घ्यावेत आणि आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे. शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, मनोरंजन कक्ष, जिम आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांचेशी संपर्क (०२०-२९७०६६११) साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.