शबनम न्यूज | मुंबई (दि.१० डिसेंबर) :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आयोजित भाजप सरकारच्या विरोधात होणारे देशव्यापी आंदोलन जयपूर ,राजस्थान येथे १२ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. यासाठी पूर्वनियोजित आढावा बैठक टिळक भवन येथे पार पडली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे वतीने मुंबई चे पालकमंत्री,वस्त्र उद्योग मंत्री नामदार मा.अस्लम शेख, मा.मंत्री अरिफ नसिम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे सद्स्य व महाराष्ट्र राज्य चे प्रभारी मा. अहमद खान, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष एम.एम. शेख, उपाध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान, पच्छिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. नदिम भाई मुजावर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंग वालीया ,आशा पाटोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजरा कबिर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख ,पुणे कार्याध्यक्ष एजाज भाई सय्यद व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित बैठक पार पडली.