नगरसेवक एकनाथ पवारांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) :- महापालिकेच्या वतीने स्पाईन रस्ता, चिखली येथील घरकुल चौक ट्रॅफिक सिग्नल मुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना सुरक्षितपणे वाहतूक करता येणार आहे. स्पाईन रस्ता येथील घरकुल चौक व परिसरातील निर्माण झालेले अनेक गृहप्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वाहतूक रहदारीमुळे या घरकुल चौकात वारंवार अपघात होत आहेत. तसेच, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यासंदर्भात नगरसेवक एकनाथ पवार यांनी त्याठिकाणी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
नगरसेवक एकनाथ पवार यांच्याकडे परिसरातील रहिवाशांनी तक्रार केली. तो प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक पवार यांनी महापालिका वाहतूक पोलिसांसोबत व बैठक घेऊन मार्ग व चौकाच्या सुशोभीकरणासाठी सुरक्षेच्या विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते काम सुरू करण्यात आले. घरकुल चौक सिग्नल फ्री होऊन वाहनचालकांना सुरक्षितपणे ये – जा करता येणार आहे.