शबनम न्यूज | पुणे (दि.१० डिसेंबर) ;- पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीची ‘पी.ओ.एस.स्पेक्ट्रम २०२१’ ही वार्षिक परिषद ११,१२ डिसेंबर रोजी पुण्यात होत आहे.
शनिवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता परिषदेचे उदघाटन रॉयल कॅनॉट बोट क्लब पुणे येथे होणार आहे.उदघाटनाच्या सत्रात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या परिषदेला ऑनलाइन संबोधित करणार असून उद्घाटन समारंभासाठी पद्मश्री डॉ तात्याराव लहाने,ब्रिगेडियर डॉ.एन एस मणी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.संजय टेकावडे,सचिव डॉ.ऋजुता माचवे,खजिनदार डॉ.सीमा खैरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. परिषदेचे हे १४ वे वर्ष आहे. परिषदेच्या स्मरणिकेचे आणि डिरेक्टरीचे प्रकाशन उद्घाटन सत्रात होईल. नेत्रसेवा क्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल. नेत्रोपचार,नेत्रविकार,चिकित्सा विषयक नवीन तंत्रज्ञान सद्यस्थिती याविषयी परिषदेत चर्चा होईल.संशोधनपर निबंध सादर केले जातील,असे डॉ.टेकावडे यांनी सांगितले.