शबनम न्यूज | पुणे (दि.१० डिसेंबर) ;- नागरिकांचा विरोध असताना देखील जबरदस्तीने एसआरए प्रकल्प राबविण्यात येऊ नये यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर महामोर्चास मार्गदर्शन करताना डंबाळे यांनी पुढील प्रमाणे प्रतिपादन केले “ नागरिकांच्या हिताचा बळी घेऊन केवळ बांधकाम व्यवसायिकांना फायदा पोहोचावा यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे अन्यायकारक आहे. पद्मावती येथील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला सुमारे 13 वर्षांपूर्वी नागरिकांनी जरी संमती दिली असली तरी या संपूर्ण कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने नागरिकांनी स्वखर्चातून मोठी व पक्की घरे बांधलेली आहेत. आता ती घरे पाडून पुन्हा या एसआरए करणे अन्यायकारक असल्याने नागरिकांनी या योजनेला सर्व पातळ्यांवर गेल्या चार वर्षांपासून तीव्र विरोध दर्शविला आहे. तरीदेखील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांच्या हिताचे रक्षण न करता, नागरिकांचा विरोध डावलून त्याठिकाणी येऊन जानिवपुर्वक एसआरए राबवु पाहत आहे. ती रद्द करण्यात यावी अशी मागणी आज निषेध महामोर्चा द्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे अध्यक्ष माननीय अजित पवार यांना लिखित स्वरूपात सादर करण्यात आलेले आहे. “
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या महामोर्चात राहुल डंबाळे यांच्या समवेत स्नेहल कांबळे, सागर भालेराव, मेघा आठवले , अमोल डंबाळे, किरण सोनवणे ,बालाजी वाघमारे, उमेश बनसोडे, अर्जुन लोखंडे, सुनील चिकाटे, अर्जुन गायकवाड, लतीफ भाई शेख, किशोर शिंदे , अमोल पायाळ , नाना कांबळे , रमेश चांदणे , लक्ष्मण कांबळे , आनंद कांबळे , अमानुल्ला पठाण , चांद शेख, अभिजीत कांबळे, संतोष डंबाळे , अलकाताई टेकाळे , सौ मोडक सुजाता , सायबांना निम्बर्गी, युवराज झेंडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.