शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) ;- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका, माजी शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांनी आपल्या ५ वर्षाच्या सत्ता काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून शहराच्या तसेच प्रभागाच्या विकास कामात मोलाचे कार्य केले आहे. या कार्याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या शब्दात दिली.
प्रभाग क्र २३ मौजे थेरगाव प्रभागात नागरिकांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाजनादेश देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असून या संधीमुळे अनेक विकासकामे करणे शक्य झाले आहे.
यामध्ये कार्य सम्राट, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा मार्गदर्शन खाली प्रामुख्याने थेरगाव येथे महानगरपालिकेमार्फत प्रशस्त असे सर्व सुविधा युक्त हॉस्पिटल नागरिकांसाठी उभारता आले,वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलिस चौकी सुरू करण्यात आली,बहुउद्देशिय इमारती चे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच लोकार्पण करण्यात येईल,वेंगसरकर स्टेडियम चे नूतनीकरण करण्यात आले,संपूर्ण प्रभागमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यात आली,प्रभागात अनेक ठिकाणीसिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले,स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्यात येत आहे. अमृत योजनेमार्फत संपूर्ण प्रभागमध्ये २४-७ पाण्याची लाईन टाकण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परिसरात सुशोभीकरण केले आहे.पवना नदीवर प्रसून धाम ते चिंचवड दरम्यान बटरफ्लाय पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.बापूजी बुवा उद्यानामध्ये ट्रॅक निर्मिती ओपन जिम सोबतच नूतनीकरण करण्यात आले.खेळाचे मैदान विकसित करण्यात आले. प्रभागत एलईडी लाईट बसविण्यांत आली. सामाजिक उपक्रम म्हणजेच रक्तदान,वृक्षारोपण, अन्नदान,स्वच्छता अभियान,कबड्डी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,महिलांसाठी विविध योजना, कोरोना काळात सामाजिक कार्य केलेल्या योद्धांचा सन्मान अश्या अनेक विविध कामे करण्याची संधी मिळाली.
शिक्षण समिती सभापती पदावर उल्लेखनीय कामगिरी –
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व नागरिकांच्या सहयोगाने प्रभाग क्रमांक २३ थेरगाव मधून मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, शिक्षण सभापती या पदावर असताना केलेल्या कामकाजात थोडक्यात आढावा आपल्या समोर मांडत आहे. दोन वर्षातील माझ्या प्रभागातील कामाची नोंद घेत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सूचनेवरून माजी शिक्षण समिती सभापती पदावर दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी निवड करण्यात आली शिक्षण समिती सभापती पदावर असताना खालील कामे प्रामाणिकपणाने करण्यात आली.
१. प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा बाबत माहिती घेऊन कामकाज करण्यात आले.
२. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळेतील ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची व्यवस्था करण्यात आली.
३.पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षकांना सेवे नुसार मानधन वाढ करण्यात आली.
४.पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांना ‘आम्ही घडलो वाचनाने’ उपलब्ध करून देण्यात आले.
५. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेवाळे वस्ती प्राथमिक शाळा क्रमांक 88 येथे हस्तांक्षर सुधारणा प्रकल्प प्रायोजक तत्त्वावर स्पार्कल क्लास मार्फत राबविण्यात आले.
६.पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक शिष्यवृत्ती पुस्तके व प्रश्नसंच पुस्तके सन २०२०-२१ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यांनतर कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन घोषित करण्यात आला.
७.गवळीनगर भोसरी येथील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आरक्षण क्रमांक 400 असलेल्या जागेवर मनपा प्राथमिक शाळा विकसित करण्यात आली.
८. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) करण्यात आले.
९. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा एम एस एम एस सैनिक स्कूल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उपयोगी मार्गदर्शक पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.
१०.मनपा स्थापत्य विभागामार्फत महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारती विषयक स्थापत्य कामे शिक्षण समितीच्या मान्यतेने करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
११.सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी विविध साहित्य दप्तरे, स्पोर्टशूज, गणवेष, स्वेटर वाटप करण्यात आले.
१२.. इलेक्ट्रॉनिक बस सेवा,आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,शिक्षण सभापती सौ मनिषाताई पवार उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विभागातील बालवाडी व इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी एज्युकेशन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सन २०२१-२२ ची मान्यता असलेले बालवाडी व पहिली ते आठवी प्राथमिक विभागासाठी व पाचवी ते दहावी माध्यमिक विभागासाठी अभ्यासक्रम सहित्या सर्व माध्यमा करिता केंद्र शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्याबाबत वारंवार प्रयत्न करण्यात आले गेल्या. दोन शैक्षणिक वर्षात शिक्षण उपयुक्त कामे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आढावा थोडक्यात आपल्या समोर मांडत आहे.