शबनम न्यूज | पुणे (दि.११ डिसेंबर) :- पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे 13 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
Advertisement
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येते. बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो.
पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १३ डिसेंबर २०२१ रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी ११:३० वाजता सभागृह क्र. १ विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे उपायुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
Advertisement