शबनम न्यूज | मुंबई (दि.११ डिसेंबर) :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम आरोग्य कवच’ या नव्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. या योजनेंतर्गत ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल. एकूण २७ प्रकारच्या मोफत चाचण्या या माध्यमातून केल्या जाणार असून तब्बल सव्वा कोटी ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची कार्यपद्धती ठरविण्यासाठी राज्य सरकारने उच्च स्तरीय समिती गठीत केली होती. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचे सीईओ या समितीचे अध्यक्ष होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement