गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
गजाला सय्यद
शबनम न्यूज | मुंबई (दि.१२ डिसेंबर) :- म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
काही अपरिहार्य कार्यामुळे, तांत्रिक अडचणीमुळे आज होणारी म्हाडाची परीक्षा व नंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात घेतल्या जातील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी सेंटर वर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांनी गाव सोडू नये, असे बोलून जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांशी क्षमा ही मागितली आहे.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0GAdvertisement— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021