शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१२ डिसेंबर) :- लोकनेते शरद पवार यांचा वाढदिवस संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदार संघात विकास नगर ,किवळे परिसरातील राष्ट्रवादीचे युवा नेते, संकल्प सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून केअर लाईफ लाईन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये मोफत ब्लडप्रेशर, मोफत शुगर तपासणी, फुल बॉडी चेकअप, मोफत ईसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरा दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांचे प्रमाणपत्रांचे मोफत स्मार्ट कार्ड बनवून वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कमीत कमी साडेतीनशे नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली सदर आरोग्य तपासणी शिबिर दरबार मिसळ शेजारी, दांगट वस्ती, विकास नगर, किवळे येथे संपन्न झाला.
या वेळी किसन दादा नेटके ,माजी नगरसेवक मनोज खानोलकर ,रवी नाना चव्हाण, उपसरपंच दिनकरराव कातळे ,अंकुश तरस ,बाळासाहेब तरस, रामभाऊ दांगट, संजय कातळे, ,धर्मपाल तंतरपाळे, पूजा मुर्गेश, दिलीप कडलक, भारत शिवणकर ,शुभम दांगट, प्रसाद तरस राजेंद्र नेटके ,ज्ञानेश्वर शेळके ,संदीप तरस, आदी मान्य उपस्थित होते .
या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांनी सहभाग घेऊन सदर शिबिर मोठ्या प्रमाणात यशस्वी केले याबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते बापू दिनकर कातळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.