शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१२ डिसेंबर) :- आज लोकनेते शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिम्मित्त नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते अविनाश शंकर चौधरी (अध्यक्ष-धम्मानंद प्रतिष्ठाण) यांच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तिनचाकी व दुचाकी ३१८ वाहनांनी तपासणी केली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गाड्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने प्रभागात मोफत PUC तपासणी शिबीर घेण्यात आले.
PUC तपासणी व त्यासंबंधी जनजागृती करणे हे पर्यावरण रक्षणासाठी आमच्यातर्फे टाकलेले एक छोटे पाऊल आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये संतोषाचे वातावरण पाहायला मिळाले असून भविष्यातही असे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावण्याचा धम्मानंद प्रतिष्ठाणचा मानस आहे.
या उपक्रमांत नगरसेवक समीर मासुळकर, जेष्ठ तिम्माशेठ टाकळे, शहाजी जगदाळे, सतिशजी चौधरी, हरप्रित सिंग, आकाश शिंदे , शहाजी जगदाळे , चंद्रकांत गवळी, अनिल कोकिरकर, नवनाथ डेंगळे, संतोंष गायकवाड, फकिरा कदम, अनिल साळवी, विकास गायकवाड, जितीन ठांणाबिर, राजेश कदम आकाश गायकवाड व इतर जेष्ठ व युवकांनी उपस्थिती दाखवली.