७९ देशांच्या सुंदरींवर मात करत पटकावला मिस युनिव्हर्स किताब
शबनम न्यूज | (दि.१३ डिसेंबर) :- २१ वर्षीय हरनाज संधूने मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.हरनाज संधूने ७९ देशांमधील सुंदरींवर मात करत मिस युनिव्हर्स किताबावर आपलं नाव कोरलं आहे. तब्बल २१ वर्षांनतर भारताला हा किताब मिळाला.
हरनाजने मिस युनिव्हर्स इंडिया २०२१ स्पर्धा जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्ससाठी कठोर परिश्रम सुरु केले होते.
याआधी २००० मध्ये लारा दत्ताने हा किताब मिळवला होता. आता २०२१ मध्ये भारताच्या पंजाबमधील हरनाज संधूने हा किताब पटकावला आहे.
हरनाजने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस बॅकसह तिच्या सौंदर्य स्पर्धेचा प्रवास सुरू केला. 2017 मध्ये तिने मिस चंदिगढचा किताब जिंकला होता. त्याच प्रमाणे तिच्याकडे फेमिना मिस इंडिया पंजाब 2019 सारखी अनेक स्पर्धा खिताब देखील आहेत. हरनाजने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये ती टॉप 12 मध्ये पोहोचली होती. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
स्वत:वर विश्वास ठेवल्यास अशक्य काहीच नाही
तुम्ही दुसर्यांबराेबरील तुलना बंद करा. तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवल्यास जगात काेणतीही गाेष्ट अशक्य नाही, माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे,तिने स्पर्धा जिंकल्यानंतर हे उद्गार काढले आहे.
भारताला तिसऱ्यांदा बहुमान
मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला आतापर्यंत केवळ दोनच वेळा बहुमान मिळाला होता. हरनाज ही भारताची तिसरी मिस युनिव्हर्स ठरली आहे. यापूर्वी1994 मध्ये सुष्मिता सेन, तर 2000 मध्ये लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला होता.
The new Miss Universe is…India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021