नगरसेवक कैलास बारणे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१३ डिसेंबर) :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यमान नगरसेवक कैलास बाबा बारणे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने थेरगाव स्विस काउंटी येथे 32 वी जिल्हास्तर किशोर ,किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दिनांक 8 ते 11 डिसेंबर दरम्यान संपन्न झाली.
सदर स्पर्धेमध्ये किशोरी गट 24 संघाने तर किशोर गट 64 संघाने भाग नोंदविला होता. सदर सामने बाद पद्धतीने पूर्ण करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन माजी विरोधी पक्ष नेते, विद्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर स्पर्धेच्या दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महानगरपालिका, बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला आघाडी राष्ट्रवादी शहर अध्यक्षा वैशाली ताई काळभोर, नगरसेविका मायाताई बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, सर कार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन मधुकर काका बोर्डे, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन वासंती ताई, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्ता झिंजुर्डे, पुणे जिल्हा असोसिएशन सदस्य अनिल यादव, पुणे जिल्हा असोसिएशन सहकार्य वाहक राजेंद्र आंदेकर ,पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यवाहक योगेश यादव, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य राजेंद्र काळोखे, मैदान प्रमुख शेखर रावडे, वजन कमिटीचे तात्या बालवडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अंतिम सामना किशोरी गट मुली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा कला विकास प्रकल्प विरुद्ध नवतरुण क्रीडा संघ सासवड यांच्यामध्ये 30-21 असा झाला. सदर सामन्यात पीसीएमसी चा संघ विजयी झाला विजय संघाकडून प्रतिक्षा लांडगे, श्रावणी सावंत, कीर्ती कडगंची, सानिया मिर्झा यांनी उत्कृष्ट चढाया यांचे प्रदर्शन केले. सदर संघातील सुजाता पवार, सपना काळे, माया सोनवणे, सरस्वती शिव मोरे, उत्कृष्ट पकडी चे प्रदर्शन केले. तसेच संघातील पूनम जाधव, मुक्ता वाको, निशा जाधव, रूपाली राठोड यांनी सांघिक प्रयत्न करत विजय खेचून आणला.
मुलांचा अंतिम सामना वाघेश्वर कबड्डी संघ चरोली विरुद्ध भैरवनाथ संघ भोसरी 35 – 20 अशा 15 गुणांनी वाघेश्वर संघ चऱ्होली कबड्डी संघ विजय झाला. विजय संघाकडून पृथ्वीराज तापकीर, आयुष कोतवाल, यांनी उत्कृष्ट चढाया तर रितेश डवले, श्रेयस रासकर यांनी उत्कृष्ट पकडी केल्या .पराजित संघाकडून अभिषेक वेदपाठक, करण साळुंखे, विराज डोळस व निखिल पवळे यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कैलास उर्फ बाबा बारणे (नगरसेवक,पिंपरी चिंचवड महानगरपालिका), सचिन बारणे (सामाजिक कार्यकर्ते), प्रवीण बारणे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर स्पर्धेचे उत्तम कामकाज शेखर रावडे, बंसी आठवे, अण्णा मुटके, अनिल यादव यांनी पाहिले. बारा मुलं व बारा मुलींची परभणी येथे दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान होणार राज्य स्तर किशोर किशोरी गट निवड चाचणीसाठी हर्षल यादव, दत्ता कचरे, साहेबराव गाढवे, श्रीमती सोनाली जाधव, वर्षा मुंडे वैष्णवी पांडे यांच्या निवड समितीकडून निवड होणार आहे.