शबनम न्यूज | पुणे (दि.१३ डिसेंबर) :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मातंग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची 227 वी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेविका, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधाताई गोरखे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नगरसेविका अनुराधाताई गोरखे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गरजवंतांना नेहमी मदतीचा हात तसेच शहरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिके अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात नगरसेविका अनुराधाताई गोरखे या नेहमीच तत्परतेने कार्य करीत असतात. कोरोना काळातही त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने कोरोना रुग्णांची सेवा असो अथवा गरजू नागरिकांना या काळात केलेली मदत असो हे सर्व कार्य उल्लेखनीय आहेत. या सर्व कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मातंग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सदर कार्यक्रम हा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या सभागृहात सोमवार दिनांक 13 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मातंग विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश राजगे यांनी दिली आहे.