शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
(दि.१५ डिसेंबर) :- लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या आर्थिक सहकार्यातून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाच्या इमारतीचा बाह्यभाग आकर्षक रंगाने रंगविण्यात आला. रंगकामासाठी लागलेला पंधरा हजार रुपये मदतनिधीचा धनादेश लायन दिलीप सोनिगरा आणि अध्यक्ष नरेंद्र पेंडसे यांनी मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी लायन विनय देशपांडे, खजिनदार लायन नंदिता देशपांडे उपस्थित होते. भविष्यात शाळाविकासासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सोनिगरा सुवर्ण पेढीचे सर्वेसर्वा लायन दिलीप सोनिगरा यांनी यावेळी दिले.