शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१५ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका, माजी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड तसेच माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या वतीने प्रभाग नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर डोळे तपासणी शिबिर डॉ. ज्ञानमोटे क्लिनिक दामोदर हाईट्स, पानसरे सोनोग्राफी शेजारी 16 नंबर बस स्टॉप जवळ थेरगाव येथे रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत होणार आहे. तसेच या शिबिरात सहभागी व्यक्तींना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असणाऱ्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही या शिबिरात होणार आहे. तरी गरजू नागरिकांनी या मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन नगरसेविका ममता गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement