शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- इ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मौजे मोशी येथील क्षेत्रामध्ये नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर काल महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत निष्कसनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये एकूण ०९ अनधिकृत बांधकामे, आर.सी.सी ,वीट बांधकाम व पत्रा शेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १५५५०.०० चौरस फूट पाडण्यात आली आहेत.
सदर कारवाई माननीय अतिरिक्त आयुक्त श्री जितेंद्र वाघ व माननीय शहर अभियंता श्री मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता श्री संजय घुबे यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण पथक, एम. एस. एस जवान, पोलीस व मनपा कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
Advertisement