शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- प्रभाग क्रमांक १४ मधील आरक्षित भूखंड हनुमान क्रीडांगण येथे स्वछता करण्यात यावी, अशी मागणी संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान,निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड़ मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक – १४ मधील आरक्षित भूखंड हनुमान क्रीडांगण या भूकंडावर मोठया प्रमाणात मातीच्या ढिगाराचा व मुरुमचा साठा करण्यात आला आहे. तो मुरूम त्या जागेतुन काढण्यात यावा, त्या मुळे त्या जागेत मोठी झाड़े झुंड़पे वाढली आहेत ती काढण्यात यावी, सदर भूखंडा मधे एक जूनी विहीर आहे त्या विहीरी मध्ये देखील खुप घाण कचरा साठला आहे. त्या मुळे या भूखंडाच्या परिसरात खुप डास झाले आहेत, या भूखंडा च्या शेजारी मनपा आकुर्डी दवाखाना आहे. त्या ठिकाणी प्रसूति गृह म्हणजेच महिला डिलेवरी वॉर्ड आहे. या दवाखान्यात लहान मुले जन्म घेतात. या भूखंडा मध्ये पसरलेल्या दुर्गंधीमुळे तेथील बालकांचे व उपचार घेत असलेल्या महिलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. भूखंडा शेजारी लहान मुलांची केम्रिज इंग्लिस मिडियम शाळा आहे.
त्या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांचा देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता, या भूखंडा वरील मातीचे व मुरमाचे ढिगरे या ठिकाना वरून काढण्यात यावे, व सर्व वाढलेली झाले झुंड़पे तोडून स्वछता करण्यात यावी, सदर भूखंडामध्ये असलेल्या विहिरी ची स्वछता करण्यात यावी, असे हि सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.